चंडीगढ : प्रसिद्ध उद्योगपती नितीन कोहली यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला.ते आता जालंधर मध्य मतदारसंघात प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. गेल्या आठवड्यात ‘आप’चे जालंधर मध्य मतदारसंघाचे आमदार रमन अरोडा यांना भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात पंजाब दक्षता विभागाने अटक केली होती. त्याआधी, अरोडा यांच्या घरावर छापा घातला होता.पंजाबचे उद्योगपती ‘आप’च्या कारभारावर विश्वास ठेवून पक्षाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ही आनंदाची बाब आहे, असे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले.
Fans
Followers